एकजुटिने विकास साधुया -धनंजय महाडिक



"भीमा'च्याकामगारां मध्ये ऊत्साह"

वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला भीमा सहकारी कारखान्याच्या कामगारांना  हंगामी करणे,कायम करणे,पदोन्नति देणेबाबतचा प्रश्न यावेळी मार्गी लावण्यात आला.या बैठकीत तांत्रिक आवश्यकतेनुसार

३० कायम हंगामी, 32 कामगार  कायम तर २८० कामगारांना  सिव्हिल विभाग ते हंगामी कर्मचारी   अशी पदोन्नति देऊन तसे नेमणूक आदेश कारखान्याचे चेअरमन श्री धनंजय महाडिक यांच्या हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन श्री धनंजय महाडिक म्हणाले की खासदार असताना संसदेच्या कामात व्यस्त असल्यामुळे आपल्याला कायम करणे पदोन्नती देणे हा प्रश्न लांबणीवर पडला दरम्यानच्या काळामध्ये मी भीमा सहकारी साखर कारखान्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केल्यामुळे आज खूप दिवसापासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला असल्याचे यावेळी कारखान्याचे चेअरमन धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी सांगितले

 

याप्रसंगी अशोक पवार ,अंगद पवार, राजकुमार निवृत्ती गायकवाड, विष्णू गोविंद अंकुशराव, तानाजी कृष्णा पवार, मुलानी आयुब नुरम्हम्मद या पाच जनांना चेअरमन मा.खा.धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रमाण पत्र देण्यात आले. 


आसबे साहेब चिफ इंजिनीअर, भाऊसाहेब जगताप ओ.एस, पाटील साहेब, मिल अॉफिसर, इंगळे साहेब चिफ अकॉटंट ,दत्ता पाटील परचेस अॉफिसर, महादेव बाबर संघटना प्रतिनिधी, भगवान बाबर यांनी या सर्व कामगारांना न्याय देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे.



यावेळी चेअरमन मा. धनंजय महाडिक, व्हा.चेअरमन सतिश जगताप, कार्य. संचालक सूर्यकांत शिंदे,सर्व संचालक मंडळी व पदाधिकारी उपस्थितीत होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget