सोलापूर // प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला भीमा सहकारी कारखान्याच्या कामगारांना हंगामी करणे,कायम करणे,पदोन्नति देणेबाबतचा प्रश्न यावेळी मार्गी लावण्यात आला.या बैठकीत तांत्रिक आवश्यकतेनुसार
30कामगार कायम हंगामी, 32 कामगार कायम तर 480 कामगारांना सिव्हिल विभाग ते हंगामी कर्मचारी अशी पदोन्नति देऊन तसे नेमणूक आदेश कारखान्याचे चेअरमन श्री धनंजय महाडिक यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन श्री धनंजय महाडिक म्हणाले,"खासदार असताना संसदेच्या कामात व्यस्त असल्यामुळे आपल्याला कायम करणे पदोन्नती देणेचा प्रश्न लांबणीवर पडला.दरम्यानच्या काळामध्ये आपण ऊस उत्पादक सभासदांचा अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी एक्सपान्शन प्रोजेक्ट हातीघेतला,त्यासोबत अधिक नफा मिळवण्यासाठी को- जनरेशन प्रोजेक्ट चे काम सुरू केले.परंतु नैसर्गिक परिस्थिती अनुकूल राहिली नाही.दर एक वर्ष पडणारा दुष्काळ त्यामुळे ऊसाची कमी उपलब्धता यामुळे दुर्दैवाने एक्सपान्शन कॉजनरेशन चे आपले टाइमिंग चुकल्यामुळे त्यासाठीच्या मोठ्या कर्जाचा व्याजाचा आलेला अतिरिक्त ताण व साखर कारखानदारी पुढील विविध आर्थिक समस्यांमुळे आपल्या कारखाना पुढे आर्थिक कोंडी निर्माण झाली. आपल्या कारखान्याच्या सर्व कर्तव्यदक्ष कामगारांचे वेतन आपण वेळेवर देऊ शकलो नव्हतो.त्यामुळे माझ्या कामगारांना मोठ्या आर्थिक अडचणींना,त्रासलेला
तोंड द्यावे लागले त्याबद्दल आम्ही सर्व संचालक मंडळ दिलगिरी व्यक्त करतो. कारखान्याच्या अडचणीच्या काळात माझ्या कामगारांनी व माझ्या सभासदांनी समजूतदारपणा दाखवत जो संयम दाखवला त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे मनापासून आभारी आहोत.परंतु एक्सपान्शन कोजनरेशन ही त्यावेळेला काळाची गरज होती.हे दोन्ही हाती घेण्यामागे आपला सर्वांचा एक प्रामाणिक आणि शुद्ध हेतू होता. कॉजनरेशन प्रकल्पामुळे आपल्या कारखान्याला दरवर्षी सुमारे चाळीस कोटी रुपयांचा जादा नफा होणार आहे..गेल्या संचालक मंडळामध्ये हा निर्णय अनेक वर्ष रखडलेला होता हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन छेडल्या बँकेकडून कर्जपुरवठा व सरकारी पातळीवर आम्हाला अनेक अडथळे निर्माण झाले. मित्रांनो काही लोकांनी तर आपल्याला राज्य सरकारची थकहमी मिळू नये म्हणून साखर आयुक्तांकडे निवेदने दिली. हे योग्य नव्हे. झाले गेले विसरून जाऊ आपल्याला संस्थेचा विकास साधावयाचा आहे. स्वर्गीय भिमराव दादांनी हा कारखाना उभा करताना या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचे जे स्वप्न पाहिले होते हे स्वप्न अपूर्ण राहिले होते.भीमा ही टाकळी सिकंदर व आजूबाजूच्या परिसराची आर्थिक वरदायिनी आहे.सर्व उद्योग व्यवसाय या संस्थेवर अवलंबून आहेत. भीमा हा या परिसराच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. ही संस्था डौलाने चालली पाहिजे ही या भागातील प्रत्येक व्यक्तीची मनोमन इच्छा आहे.तेव्हा भीमा या संस्थेवर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्या सभासद व कामगार बंधुंनो झाले गेले विसरून जावु .इथून पुढे आपण सर्वजण एकजुटिने भीमाचा विकास साधण्याचा प्रयत्न करुया. मी माझ्या कोल्हापूरच्या व्यापातून जास्तीत जास्त वेळ देण्याची ग्वाही देतो. आता आपण थकित एफ आर पी व कामगारांचे थकीत वेतन देण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. सभासद भीमाला मोठ्या प्रमाणावर गाळपासाठी ऊस पाठवत आहेत. भीमा समोरील सर्व अडचणी जवळपास दूर झालेल्या आहेत उर्वरित अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावेन. मला तुमची साथ हवी आहे आणि तुम्ही ती द्याल असा मला विश्वास वाटतो.
याप्रसंगी कामगार नेते अशोक पवार, राजकुमार गायकवाड, विष्णू अंकुशराव, तानाजी पवार, आयुब मुलानी या पाच जनांना चेअरमन मा.खा.धनंजय महाडिक यांच्या हस्ते बढतीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे चिफ
इंजिनियर साहेब
आसबे साहेब, ऑफिस सुपरिटेंडेंट भाऊसाहेब जगताप मुख्य शेती अधिकारी श्री पाटील मिल ऑफिस सर, अकाउंट इंगळे साहेब पाटील परचेस ऑफिसर दत्ता पाटील, महादेव बाबर ,संघटना प्रतिनिधी, भगवान बाबर या सर्वांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
यावेळी चेअरमन मा.धनंजय महाडिक, व्हा.चेअरमन सतिश जगताप, कार्य. संचालक सूर्यकांत शिंदे,सर्व संचालक मंडळ व विविध पदाधिकारी उपस्थितीत होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.