नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे प्रत्येक रविवारी मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबीर आयोजित

 


डाॅ.शितल के.शहा यांच्या प्रयत्नाने बाल हृदयरोग तज्ञ डाॅक्टर करणार उपचार


पंढरपूर // प्रतिनिधी

पंढरपुरातील नामलौवकिक असलेल्या नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे लहान‌ बाळांच्या हृदयरोग व अन्य गंभीर आजारावर पंढरपूर मध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत. पंढरपूर शहरातील तज्ञ डाॅ.शितल के.शहा यांच्या पुढाकाराने प्रत्येक रविवारी मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात येणार असून हे शिबीर व आॅपरेशन खर्च देखील‌ मोफत करण्यात येणार असल्याचे डाॅ.शितल के.शहा सांगितले आहे. 



० ते १८ वर्षातील  लहान बाळाच्या हृदयाचे छिद्र बंद करण्यात येणार आहे. मुंबई नंतर प्रथमच पंढरपूरात हे एकमेव सेंटर सुरु झाल्याने नागरिकांची सोय उत्तम होणार असल्याचे मत डॉ. शहा यांनी व्यक्त केले.



बाळ निळसर पडणे, वजन न वाढणे, जोरजोरात श्वास लागणे, दुध व्यवस्थित न पिणे, दुध पिताना कपाळावर घाम येणे, वारंवार न्यूमोनिया होणे, हृदयाचे जन्मता छिद्र असणे, ओपनहार्ट शस्ञक्रिया,  फुफसाचे आजार, किडनीचे आजार, मेंदुचे आजार अशा विविध सर्व आजारांवर उपचार करण्यात येत असून पुणे येथील तज्ञ डाॅ.संतोष जोशी हे प्रत्येक रविवारी पंढरपूर येथे येवुन या शिबीरातील बाळांची तपासणी करणार आहेत. याचबरोबर डाॅ. शितल शहा, डाॅ सुधीर आसबे, डाॅ.विनायक उत्पात, डाॅ.सुनिल पटवा, डाॅ.पुरुषोत्तम तापडिया,  या हाॅस्पिटलमधील डाॅ.विकास मस्के, डाॅ.प्रदिपकुमार सुर्यवंशी, डाॅ.अबिद अली, डाॅ.सुनिल तडवलकर, भुलतज्ञ डाॅ.सुभाष चव्हाण, डाॅ.पंकज गायकवाड़, डाॅ.अभिजित पाटील, डाॅ. श्रीगणेश पाटील, डाॅ.संदीप पाटील, डाॅ.मेघना चावला, डाॅ. अमित ईनामदार, डाॅ.संदिप नेमाणी, डाॅ.रेश्मा मेहता, डाॅ. सागर जंगम, डाॅ.संभाजी पाचकवडे आदी सर्व विभागातील तज्ञ डाॅक्टरांची सेवा उपलब्ध राहणार आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget