सोलापूर // प्रतिनिधी
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 74 वर्षे पूर्ण झाली असून अद्याप देखील महाराष्ट्र राज्यातील अनेक चॅनल, दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, युट्युब वेब पोर्टल इत्यादी प्रसार माध्यमातून गेली अनेक वर्षापासून अविरत प्रामाणिक पणे काम करणाऱ्या शेकडो पत्रकारांची शासन दरबारी अद्याप अधिकृत पत्रकार म्हूणन नोंदणी नाही ही बाब खूपच गंभीर व वेदनादायी असून पत्रकार म्हूणन शासन दरबारी नोंदणी नसल्याने अनेक शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांचे अतोनात नुकसान होत असूनअल्प मानधनावर काम करणाऱ्या ग्रामीण भागातील पत्रकारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक व हालाकीची व बिकट झाली असून शासन दरबारात नोंदणी नसल्याने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या नोंदणी नसल्याने विविध योजनेचा लाभ अश्या पत्रकारांना मिळत नाही या बाबी कडे पत्रकार सुरक्षा समिती चे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांनी लक्ष घालण्यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र देऊन विनंती केली आहे.
आम्ही पत्रकार नाही का
गेली अनेक वर्षा पासून आम्ही पत्रकार म्हूणन काम करत असून देखील राज्य सरकार आम्हाला अधिकृत पत्रकार का समजत नाही? असा रोक ठोक सवाल मुख्यमंत्री यांना विचारला असून आम्हाला कायदेशीर पत्रकार म्हूणन मान्यता देण्यात यावी अन्यथा राज्यातील पत्रकारांना घेऊन आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे
राज्यातील पत्रकारांच्या नोंदणी बाबत सर्वच जिल्हा माहिती अधिकारी यांना पत्रकार नोंदणी बाबत आदेश देण्यात यावेत अशी मागणी देखील पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांनी मुख्यमंत्री यांना केली असून सदरचे पत्र सोलापूर चे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिले आहे


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.