विस्थापित नगरमधील नुकसान झालेल्या नागरिकांना मनसे मदत, पन्हाळी पत्रे आणि संसारपयोगी साहित्याचे वाटप : दिलीप (बापू)धोत्रे




सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपूर नगरपालिकेने शहरातील  विस्थापित नगरमधील लोकांची घरे आणि छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान केले.  त्यामुळे  त्यांचे घरावरील पत्रे आणि इतर साहित्याचे नुकसान झाले होते,या नुकसानीची पाहणी मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांनी करून असून जे काही नुकसान झाले आहे ते साहित्य आणि पन्हाळी पत्रे मनसेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांनी नुकसान ग्रस्त कुटुंबाना दिले, त्यामुळे गोरगरीब कुटुंबाना दिलासा मिळाला आहे,

    या विस्थापित नगर मधील अनेकांच्या घराची नुकसान केल्यामुळे, त्याचे पत्रे, वासे, लाईट कनेक्शन आदी साहित्याचे जे नुकसान झाले आहे ,त्यासाठी आपण मदत करणार असल्याचे दिलीप धोत्रे यांनी या भागातील भेटी दरम्यान  सांगितले होते. यामुळे   आज त्यांनी सर्वाना मदत केली ,यावेळी, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड उपाध्यक्ष महेश पवार, मिलिंद गायकवाड,प्रताप भोसले, सागर बडवे, प्रथमेश पवार, नागेश इंगोले, इत्यादी उपस्थित होते,,

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget