खेडभोसेच्या उपसरपंचपदी माधुरी जमदाडे यांची निवड




सोलापूर // प्रतिनिधी 

खेडभोसे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माधुरी शहाजी जमदाडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आहे.

खेडभोसेचे (ता.पंढरपूर) उपसरपंच सिध्देश्वर पाटील यांनी जुलै 2020 मध्ये राजीनामा दिला होता. मात्र कोरोना महामारीमुळे नूतन उपसरपंच निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. 

 ग्रामपंचायतीची आज शुक्रवारी (दि.29) उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा सरपंच सज्जन लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या उज्वला जमदाडे, छाया पवार, माधुरी जमदाडे, मालन सुरेश पवार, राणू पवार, सिद्धेश्वर पाटील, संजय देवळे, रामचंद्र लांडगे उपस्थित होते.

उपसरपंच पदासाठी माधुरी जमदाडे यांचाच अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सज्जन लोंढे यांनी सौ. जमदाडे यांची सर्वसंमतीने बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

या वेळी मा पोलीसपाटील अंकुश पाटील बंडू पवार सदाशिव पवार विकास पवार  क्रष्णा बेलकर  युवा नेते बालाजी पवार शाहाजी जमदाडे दिपक जमदाडे नाना जमदाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी प्रकाश भिंगारे, ग्रामसेवक महेश खांडेकर यांनी काम पहिले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget