पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर येथील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ प्रशांत निकम यांच्या सरगम चौक येथील निकम हॉस्पिटल येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ प्रशांत निकम यांनी दिली आहे
मागील 11 वर्षाची परंपरा जपत या वर्षीही रविवार दि 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. आयोजितया शिबिरामध्ये गुडघे, खांदे, आणि खुबे, या मधील विविध आजारावर मोफत तपासणी होणार आहे.
या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या रुग्णाची ज्वाईंट रिप्लेसमेंट सर्जन कडून मोफत तपासणी, हाडाची घनता तपासणीसाठी केवळ 1500 रुपयेफी, एक्सरे साठी 50 टक्के सवलत, रक्त लघवी साठी 50 टक्के सवलत, औषधांवर 5 टक्के सवलत, फिजिओथेरपी साठी 25 टक्के सवलत,यासह इतर कोणत्याही ऑपरेशन साठी 50 टक्के सवलत या हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरासाठी ठेवण्यात आली आहे.
पंढरपूर येथे प्रथमच सवलतीच्या दरात सांधेरोपण, आणि दुर्बिणीतूत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.ययासाठी दीड लाखापर्यंत खर्च असलेल्या या गूढग्याच्या सांधेरोपन साठी केवळ सवलतीच्या दर म्हणून 90 हजार रुपयेत फी आकारण्यात येणार आहे ,दुर्बिणीतील शस्त्रक्रियेसाठी 70 हजार ऐवजी केवळ 40 हजारमध्ये केले जाणार आहे.
या हॉस्पिटल चे केवळ 150 रुपये फी भरुन सभासद झाल्यास अनेक फायदे मिळणार आहेत. सहा महिने तपासणी फी मध्ये 25 टक्के सवलत, एक्सरे साठी 25 टक्के सवलत, रक्त ,लघवी तपासणीसाठी 25 टक्के सवलत, ऍडमिट बिल सवलत 25 टक्के, ऑपरेशन साठी 25 टक्के सवलत, आदी विविध सवलतीचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी उपस्थित राहावे असे आवाहनही डॉ प्रशांत निकम यांनी केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.