संसदरत्न मा.खा.धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त फुटबॉल स्पर्धांचे आयोजन


                                  

देशातील टॉपवन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे जनमाणसांचे लाडके संसदरत्न मा.खा.धनंजय महाडिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फुटबॉल स्पर्धांचे आयोजन.                    


संपूर्ण देशभरात टॉपवन राहिलेले,आपल्या कार्यातून ठसा उमटवणारे असे जनमाणसांचे संसदरत्न मा.खा.धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी केला जातो.   तसेच याही वर्षी त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून करण्यात येणार असून शिंगणापूर गावात फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याचे शिंगणापूर गावाचे उपसरपंच मा. जालिंदर पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले आहे.याप्रसंगी स्पर्धांचे नियोजन कर्ते भाजपाचे श्री दत्तात्रय आवळे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस (ओबीसी_एससी) यांच्या हस्ते टॉस उडवून सदरच्या स्पर्धेस सुरूवात करण्यात आली. 


सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांना फुटबॉलची आवड व्हावी यासाठी, या सर्व स्पर्धांचे व्यवस्थितपणे व नेटके नियोजन श्री दत्तात्रय आवळे यांनी केले आहे. 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, इंद्रजीत पाटील, शहाजी मर्दाने, पोपट दिवसे,जालिंदर मुंडे, लक्ष्मण सावरे, नितीन गवळी, रफिक पठाण, सरदार पाटील, गोपी गागडे, गणेश नगर आदिंच्या उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget