वृत्तसंस्था // प्रतिनिधी
दि.14.आगाराची शिवशाही बस क्रमांक एम एच ०६ बी डब्ल्यू ४४१३ दि. १३/०२/२०२१ रोजी रात्री ११:०० वाजता च्या नांदेड – हैदराबाद फेरीवर धावत असताना दिनांक १४/०२/ २०२१ रोजी सकाळी ०४:०० वाजता कामारेड्डी (तेलंगणा राज्य) च्या अलीकडे सदर बस रस्त्याच्या खाली उतरून २-३ पलट्या घेतल्याने अपघात झाला.
बस मध्ये अपघाताच्या वेळी एकूण ३६ प्रवासी होते. सदर अपघातात १७ प्रवाशांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली.सदर अपघातात रा. प. चालकाच्या डोक्याला मार लागला असून वाहकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
चालक वाहक व सर्व जखमी प्रवाशांना कामारेड्डी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कामगिरी वरील
चालक- श्री. विजयकुमार वाघवसे, बि. क्र. – १८६८८ व
वाहक – श्री अब्दुल करीम, बि. क्र. – १५८२६ हे होते.
प्रथम दर्शनी सदर अपघात बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याने रा. प. चालक जबाबदार दिसून येत आहे.
सदर अपघाताची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक बिलोली श्री.चंद्रशेखर समर्थवाड घटनास्थळी रवाना झाले असून यंत्र अभियंता (चालन) तथा विभाग नियंत्रक श्री.अशोक पन्हाळकर घटनास्थळा कडे तात्काळ रवाना झाले आहेत.
तेलंगाना राज्य परिवहन चे अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले आहेत.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.