सोलापूर // प्रतिनिधी
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासुन सतत देशाची संपत्ती असलेल्या सरकारी कंपन्या विकत आहेत. परवाच्या बजेट मध्येही LIC व इतर कंपन्यांचे खाजगीकरणाच्या नावाखाली विकण्याच्या निर्णय घेण्यात आला. याच्या विरोधात मोदी सरकारच्या विरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन जवळ निदर्शने आंदोलन करुण निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना शहर युवक काँग्रेसच्या वतीने अंबादास बाबा करगुळे म्हणाले की काँग्रेसने काय केले असे विचारत व खोटेनाटे आश्वासने देऊन मोदी सरकार सत्तेवर आले. सत्तेवर येताच जनताविरोधी धोरणे, निर्णय राबवित आहेत. त्यामुळे देश कंगाल होत असुन आर्थिक संकटात आहे. काँग्रेसने सत्तर वर्षात उभ्या केलेल्या लाखो कोटीच्या सरकारी कंपन्या देशाची संपत्ती असुन ते खासगीकरणाच्या नावाखाली विकत आहेत. आजपर्यंत भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, एअर इंडिया, पवनहंस, IDBI व इतर बँका, रेलवे, शिपिंग कॉर्पोरेशन, कोल इंडिया, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जेएनपीटी बंदर या व इतर कंपन्या मोदी सरकार टप्प्याटप्प्याने विकले आहेत. तसेच परवाच्या बजेट मध्येही LIC, बँका, वेअर हाउस, हवाई अड्डे, विजवाहिन्या, रस्ते, इंडियन ऑयल पाइपलाइन, सरकारी खुल्या जमीनी खाजगीकरणाच्या नावाखाली विकण्याच्या निर्णय घेण्यात आला. यांना शक्य असेल तर उद्या देश ही विकतील. यातील बहुतेक सर्व कंपन्या आपले उद्योगपती असलेल्या मित्रांच्या घशात घालण्याचे काम मोदी सरकार करत आहेत. यामुळे सरकारी नोकरया ही निर्माण होणार नाहीत. नोकऱ्यामधील आरक्षण ही संपणार आहे. याचा विरोध करण्यासाठी, मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, मध्य विधानसभा अध्यक्ष योगेश मार्गम, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, गणेश सालुंखे, कार्याध्यक्ष पंडित सातपुते, राहुल वर्धा, युवराज जाधव, दिनानाथ शेळके, राहुल गोयल, महेश लोंढे, धनराज गायकवाड़, संजय गायकवाड़, यल्लाप्पा तुपदोळकर, शरद गुमटे, सतीश संगा, सुभाष वाघमारे, अप्पासाहेब गायकवाड़, सुभाष मनसावाले, आनंद भंडारे, व्यंकटेश बोम्मन, नरेश महेश्वरम, अनवर शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.