ग्रामीण युवकांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, पण त्यांना यथायोग्य संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. संधी उपलब्ध करून देण्याचा मूळ हेतू केंद्रस्थानी ठेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतात प्रसिद्ध असलेल्या पारंपरिक क्रिकेट आदी खेळांच्या व्यतिरिक्त इतर क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे हा देखील यामागील हेतू आहे. जितके जास्त क्रीडाप्रकार प्रसिद्ध होतील तितक्या अधिक संधी उपलब्ध करून देता येतील अशी व्यापक भूमिका यामधे आहे.
यापूर्वी १९८३ मध्ये पंढरपूर येथे अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर आजच अशी स्पर्धा आयोजित होत आहे त्यामुळे पंढरपूर येथील क्रीडाप्रेमी नागरिक आणि युवक अत्यंत आनंदित झाले आहेत. पांडुरंगाच्या पावन चरण स्पर्शाने पावन झालेल्या आणि भक्तांची मांदियाळी असलेल्या आपल्या पंढरपूरला "क्रिडेची पंढरी" देखील ओळख मिळावी अशी माझी मनीषा आहे. ही स्पर्धा त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी साईनाथ भाऊ अभंगराव, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तहसिलदार विवेक साळूंखे,व पी आय.अरूण पवार, मा.श्री.महादेव धोत्रे, मा.श्री.संजयबाबा ननवरे, मा.श्री. विशाल मर्दा शेठजी, पांडुरंग बोडके, मा.श्री.भालचंद्र देवधर सर, मा.श्री.डॉ.आरिफ बोहरी, मा.श्री.विक्रमसिंग भोसले, मा.श्री.अर्जुन पवार, फुटबॉल प्रशिक्षक मा.श्री.किरण जाधव सर, मा.श्री.सुधीर (भाऊ) अभंगराव, मा.श्री.युवराज मुचलंबे, श्री. ओंकार जोशी, श्री. ओंकार वाळूजकर, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य मा.श्री.संजय अभ्यंकर, विठाई फुटबॉल क्लबचे सर्व सदस्य, मान्यवर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.