महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त यांच्या आशीर्वादाने सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त यलगुंडे यांनी बांधकाम कामगार नोंदणी करून केला कोटयावधी रुपयांचा भ्रष्टाचार.:- विष्णु कारमपुरी (महाराज)



                     

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर कामगार आयुक्त कार्यालयाचे प्रमुख श्री निलेश यलगुंडे यांनी बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करुन करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे . सदर भ्रष्टाचार ..महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त मा . श्री कल्याणकर साहेब यांच्या आर्शीवादानेच केल्याचे दिसून येते . असे गंभीर आरोप महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी केला . याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . उध्दवजी ठाकरे साहेब यांना सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी , अशी मागणी मा . मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . याच आश्याचे निवेदन मा . मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासह मा . उपमुख्यमंत्री , मा . कामगारमंत्री , मा . कामगार राज्यमंत्री , मा . पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांनाही पाठविण्यात आल्याचे महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आली आहे . 

          सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे प्रमुख सहाय्यक कामगार आयुक्त श्री निलेश यलगुंडे यांनी बोगस बांधकाम कामगार नोंदणी करुन कोट्यावधी रुपयाचे शासनाचा पैसाचा नुकसान केला आहे . अश्या आरोपाच्या विषयी मा . मुख्यमंत्री , मा . उपमुख्यमंत्री , मा . कामगारमंत्री , मा . कामगार राज्यमंत्री , यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश यलगुंडे हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत सुरु असलेल्या बांधकाम कामगार नोंदणी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील लाखो बोगस कामगारांची नोंदणी करुन कोट्यावधी रुपयाचा शासनाच्या पैशाचा भ्रष्टाचार केला आहे . यामध्ये श्री . यलगुंडे व त्यांच्या कार्यालयातील अधिकारी मिळून बाहेरील दलालांच्या संघनमताने ही बोगस बांधकाम कामगार नोंदणी केली आहे . त्यामुळे आमच्या शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेना व सोलापूर इतर कामगार संघटनेचा वतीने सहाय्यक कामगार आयुक्त श्री . यलगुंडे व त्यांचे सहकारी अधिकारी संघनमताने केलेल्या बोगस बांधकाम कामगारांची चौकशी करावी अशी मागणी मा . मुख्यमंत्री , मा . उपमुख्यमंत्री , मा . कामगार मंत्री , मा . कामगार राज्यमंत्री , मा . पालकमंत्री सोलापूर जिल्हा व सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे . असे असताना मा . कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दि . २४ मार्च २०२१ ते २६ मार्च २०२१ असे तीन दिवस सदर प्रकरणाची चौकशीसाठी समिती सोलापूरला पाठवुन दिले . समिती प्रमुख म्हणून उपायुक्त श्री . पोळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर साहेब , सहाय्यक कामगार आयुक्त खरात साहेब , सहाय्यक कामगार आयुक्त श्री . घोडके साहेब , दुकाने निरीक्षक वंझारे साहेब , लिपीक श्री रमेश भोसले साहेब यांची समिती पाठवुन श्री यलगुंडे साहेबांची बोगस बांधकाम कामगार नोंदणीची चौकशी केली असे समजते . परंतु या चौकशी कामी तक्रार धारक महाराष्ट्र कामगार सेना व इतर कामगार संघटनेला निमंत्रित केले नाही . म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दि . २७/३/२०२१ रोजी सकाळी ११.३० ते १२ दरम्यान फोन करुन मा . कामगार आयुक्तांना चौकशी समिती तक्रार धारक कामगार संघटनेला निमंत्रित केले नाही असे सांगितले त्यावेळी मा . कामगार आयुक्तांनी उध्दटपणाने बोलुन आम्हाला सर्व समजते तुम्ही गप्प बसा मला काय करायचे ते कळते आणि मी करतो असे जोर जोरात बोलले यावरुन सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश यलगुंडे व त्यांचे कार्यालयातील अधिकारी बोगस बांधकाम कामगार नोंदणी कामकाज संघनमताने केलेल्या कोट्यावधी रुपयाचा अष्टाचारास महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त यांचाही समावेश या घोटाळयात आहे असे दिसून येते . म्हणूनच ते भ्रष्टाचारी सहाय्यक कामगार आयुक्त श्री यलगुंडे यांना पाठिशी घालुन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत . 

              तरी माननीयांनी सदर निवेदनाची गंभीर दखल घेऊन सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त श्री यलगुंडे साहेब , त्यांचे सहकारी अधिकारी आणि मा . कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांची चौकशी करावी ही नम्र विनंती . असे नमूद करण्यात आले आहे . याबाबत लवकरात लवकर चौकशी न झाल्यास महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात नमूद करण्यात आलेली आहे .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget