सोलापूर // प्रतिनिधी
शासक वर्गाने बहुजन समाजासमोर जाणीवपूर्वक अनेक जीवघेण्या समस्यांचा डोंगर उभा केला आहे. आणि हेच लोक पुन्हा लोकांसमोर समस्या घेऊन येत आहेत. भोळ्याभाबड्या बहुजन समाजाला दिशाहीन केले जात आहे. भ्रष्टाचार करून पैसा मिळवतात. त्या पैशातून सत्ता मिळवतात. गरीब बहुजन समाजाला न्याय नाकारतात. आज खऱ्या अर्थाने आज बहुजन समाजाच्या समस्यांच्या संबंधाने कोणीही बोलायला तयार नाही. केवळ बहुजन मुक्ती पार्टीच समस्त मूलनिवासी बहुजन समाज यांच्या समस्यांना वाचा फोडणार आहे. याबाबत आम्ही तसूभरही मागे राहणार नाही. यासाठी ही निवडणूक आम्ही लढवत आहोत असे विधान एडवोकेट सिताराम सोनवले यांनी केले. 252, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने नामनिर्देशन पत्र दाखल केले नंतर वार्ताहरांशी ते बोलत होते. आमच्यासाठी ही निवडणूक निवडणूक नसून समस्त बहुजन समाजाला त्यांच्या हक्क अधिकारां प्रती जागृत करण्याची संधी असून आम्ही त्यांना जागृत करून त्यांच्या समस्यांना वाचा फोडणार असे ते पुढे म्हणाले. सदर नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी सत्यवान दुधाळ, जावेद मुलाणी, अशोक चौगुले, हनुमंत रणदिवे, प्रदीप परकाळे, नितीन सोनवले, अर्जुन सोनवले, काशीलिंग रणदिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.