वृत्तसंस्था // प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांनी मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून नेवासे येथे नऊ जणांना बरोबर घेऊन जावयाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे मारहाण करण्यासाठी सुपारी देऊन खेडकर यांनी काही गुन्हेगार सोबत आणल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे.
प्रेमविवाह केलेल्या प्रशांत उर्फ बंटी राजेंद्र वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरून भा.ज.पा.चे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर, हृषीकेश खेडकर, प्रदीप गायकवाड, बळीराम अर्जुन मिरगे, अमोल भीमराज कानोजे, शाहिद सय्यद, नारायण हरिभाऊ चव्हाण, तात्यासाहेब जगदाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
अटक केलेले आरोपी हे बीड जिल्ह्यतील शिरूर येथील आहेत.
त्यांच्याकडून एक मोटार, एक पिस्तूल, एक एअरगन, चाकू, गुप्ती आदी हत्यारे जप्त केली आहेत.
मे.न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना पोलीस कोठडी दिली आहे.
माणिक खेडकर, त्यांचा चुलत भाऊ व हृषीकेश खेडकर हे फरार आहेत.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, नेवासा महाविद्यालयात पहिल्या वर्गात शिकणारा विद्यार्थी बंटी उर्फ प्रशांत राजेंद्र वाघ यांचे व लातूरला बी.ए.एम.एस.च्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या पाथर्डीतील ऋतुजा माणिक खेडकर यांचे प्रेम होते.
घरच्यांनी आंतरजातीय विवाहाला विरोध केला होता.
त्याला न जुमानता ऋतुजा व बंटी यांनी एक मार्च रोजी विवाह केला.
विवाहाला विरोध असल्याने वडील खेडकर यांनी जावई बंटी याला धमकी दिली होती.
नेवाशातील कडूगल्लीत दुपारी बंटी याच्या घरी चार वाहनातून खेडकर हे लोक घेऊन आले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.