सोलापूर // प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे होते या बैठकीत पत्रकार संरक्षण कायदा जेष्ठ पत्रकार पेन्शन योजना विमा योजना घरकुल योजना पत्रकारांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी राज्यातील पत्रकारांची नोंदणी युट्युब चॅनल ला शासकीय मान्यता यादीवर नसलेल्या वृतपत्र ना शासकीय जाहिराती कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना पन्नास लाख रुपये मदत या सह पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समितीच्या राज्य कार्याध्यक्ष पदी अप्पाशा म्हेत्रे यांची एकमताने निवड करण्यात आली
*पत्रकारांच्या प्रश्नावर व्यापक आंदोलन उभा करणार*
राज्यातील पत्रकारांचे प्रश्न खूप गंभीर असून राज्य सरकार ला जाग आणण्यासाठी राज्यभर आंदोलन उभे करणार असल्याची माहिती नूतन राज्य कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे यांनी दिली असून मुख्यमंत्री यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली आहे यावेळी नूतन राज्य कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे यांचा राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांनी फेटा बांधून शाल व पुष्पगुछ व ओळख देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार शहर अध्यक्ष डॉ रवींद्र सोरटे उपाध्यक्ष बिपीन दिड्डी कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी संपर्क प्रमुख लक्ष्मण गणपा प्रसिद्धी प्रमुख भास्कर वोधूल संघटक धर्मणा गोरे वैजिनाथ बिराजदार अक्षय बबलाद हरी भिसे गिरीश गोसकी इस्माईल शेख रोहित घोडके बाबा काशीद श्रीनिवास वंगा, सिद्राम येलदी, संतोष खलाटे डी डी पांढरे, संगप्पा कांबळे अशोक माचन महेश गुंडला नागनाथ गणपा सिद्धू पुजारी इत्यादी पत्रकार उपस्थित होते
शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी यांनी मिठाई वाटप करून आनंद साजरा केला

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.