मा खा. राजू शेट्टी यांची महादेवराव महाडिक यांनी घेतली भेट!




(बंद दाराआड झाली तासभर चर्चा)


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

गोकुळ निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना दोन्ही आखाड्यातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटींवर भर दिलेला आहे.

सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बुधवारी सकाळ सकाळीच स्वाभिमानीचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. मंगळवारी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर महाडिक आणि शेट्टी यांच्या भेटीला महत्त्व आले आहे. दोघांमध्ये गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात तासभर चर्चा झाली. महाविकास आघाडीमध्ये स्वाभिमानीला जमेत धरले जात नाही. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत घेतले नाही. नेहमी दुर्लक्षित केले आहे त्यामुळे स्वाभिमानीने गोकुळमध्ये सत्ताधारी आघाडी सोबत रहावे अशी विनंती महाडिक यांनी शेट्टी यांना केल्याचे कळते आहे. दोन दिवसात कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा घेऊन निश्चित भूमिका जाहीर करू असे आश्वासन शेट्टी यांनी दिल्याचे समजते जागा वाटपासंदर्भात ही ओघवती चर्चा झाल्याचे कळते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget