सोलापूर // प्रतिनिधी
शिव सरपंच सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण सरवदे साहेब यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घ्यावे. शिव सरपंच सेवा संघटना प्रदेश उपाध्यक्ष नितीन काळे यांची शिवसेना पक्षाकडे करणार मागणी. शिव सरपंच सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण सरवदे साहेब यांना विधान परिषदेवर शिवसेना या पक्षाने आमदार म्हणून घ्यावे अशी मागणी शिव सरपंच सेवा संघटना प्रदेश उपाध्यक्ष नितीन काळे यांनी केली आहे. ज्यांनी अनेक गेल्या काही वर्षांपासून समाजसेवेचे काम हातामध्ये घेऊन गावोगावी सर्व सरपंचांना व सर्व जनतेला मोलाचा आधार देऊन आज लक्ष्मण सरवदे साहेब हे काम करत आहे. त्यांचे सामाजिक कार्य खूप मोठे आहे त्यांनी 2014 मध्ये शिवसेना या पक्षाकडून माळशिरस विधानसभा निवडणूक लढवली होती. व या विधानसभेमध्ये त्यांचा निसटता पराभव झाला होता. तरीपण त्यांचे काम त्यांनी थांबवले नाही नेहमीच ते जनतेची सेवा करत राहिले व सर्व गावातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व सरपंचांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शिव सरपंच सेवा संघटना स्थापन करून प्रत्येक गावागावांमध्ये या संघटनेचे महत्त्व वाढवून ही संघटना गाव खेड्या पर्यंत पोहोचवली. त्यांनी पोलीस खात्यामध्ये नोकरीला असताना देखील कोणताही डाग न लागता त्यांनी जनतेची सेवा व सक्षम अधिकारी म्हणून चांगल्या प्रकारे काम देखील केलेले आहे. त्यांचा राजकीय अनुभव खूप आहे त्यांनी अनेक मंत्र्यांचे पोलीस खात्यामध्ये असताना त्यांच्याबरोबर काम केले आहे. त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यांचे काम हे आकाशाला गवसणी घालणारे असून त्यांना विधान परिषदेवर घेऊन सर्व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व गाव खेड्यातील सर्व सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी आदरणीय लक्ष्मण सरवदे साहेब यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी शिव सरपंच सेवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन काळे हे शिवसेना पक्षाकडे लवकरच करणार आहेत.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.