परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांचे विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल





सोलापूर // प्रतिनिधी 

राज्य शासन व मुंबई पोलिसांविरोधात कटकारस्थान करून, शासन व पोलिसांविषयी सातत्याने अप्रीतिची भावना चेतवणारे व कर्तव्यात कसूर करून टॉप सिक्रेट गोपनीयतेचा भंग करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि नागरी संरक्षणच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांचेवर गुन्हा दाखल करण्याबाबतची लेखी तक्रार छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी पोलीस महासंचालक, गृह सचिव आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की.., मनसुख हिरेन हत्या प्रकरणामुळे परमबीर सिंग यांना दि. 17 मार्च 2021 रोजी मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन तडकाफडकी हटवण्यात आले. त्यानंतर दि. 20 मार्च रोजी परमबीर सिंग यांनी एक पत्र लिहून मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं ठेवल्याप्रकरणी अटकेत असणारे एपीआय सचिन वाझे यांचेकडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबईतील हॉटेल व्यवसायिकांकडून खंडणी घेवून महिना 100 कोटी रुपयाचा हप्ता मागितल्याचा गंभीर आरोप केला. परमबीर सिंग यांना एका महिन्यापूर्वी बेकायदेशीर खंडणीची माहिती मिळाली होती, तेव्हाच त्यांनी आपल्या कायदेशीर कर्तव्याचे पालन करून संबंधित पोलीसाचा जबाब घेवून अनिल देशमुख यांचेवर गुन्हा नोंद करायला हवा होता. परंतु, परमबीर सिंग यांनी असे काहीही केले नाही. यामागे एकच कारण आहे ते म्हणजे, त्या 100 कोटीच्या हप्त्यामधून परमबीर सिंग  यांनाही हिस्सा मिळत होता, म्हणूनच त्यांनी सदरच्या फौजदारी गुन्हाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परमबीर सिंग हे कर्तव्यात कसूर करून पोलीस व शासनाची प्रतिमा मलिन करून अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्येच्या तपासांत जाणीवपूर्वक व्यत्यय आणून आरोपी सचिन वाझेला वाचवित असून सचिन वाझे हे परमबीर सिंग यांचे अत्यंत जवळचे असल्यानेच तब्बल 16 वर्षानी परमबीर सिंग यांनी वाझेला पोलीस सेवेत रुजू करून घेतले. तसेच सचिन वाझे हा परमबीर सिंग यांचा वसूलदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्येत परमबीर सिंग यांचाही हात असण्याची दाट शक्यता असून त्यांच्या सहभागाविषयी कोणाला संशय येवू नये, म्हणूनच परमबीर सिंग हे सातत्याने वादग्रस्त खुलासे व विधाने करून पब्लिकसिटी स्टंट करीत आहे. तसेच परमबीर सिंग याचे सर्व खुलासे आणि सचिन वाझे यांचे सोबतची जवळीक बघितली तर मनसुख हिरेन याच्या प्लान्ड मर्डरची व कटकारस्थानाची आणि गृहमंत्रीने मागितलेल्या तथाकथित खंडणीची परमबीर सिंग यांना संपूर्ण माहिती होती, हे स्पष्ट होते. परमबीर सिंग हे गुन्हेगार वृत्तीचे अधिकारी असून याआधीही त्यांचेवर पुराव्यासह गंभीर आरोप झालेले आहेत. त्यासर्व प्रकरणाचा तपास करण्याची मागणीही योगेश पवार यांनी केली आहे.

योगेश पवार यांनी केलेल्या तक्रारीत पुढे असे नमूद केले आहे की., रश्मी शुक्ला यांनी विविध व्यक्ती, अधिकारी आणि नेत्यांचे अनधिकृतरित्या फोन टॅपिंग करून सदरची गोपनीय माहिती उघड करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर गदा आणून गोपनीयतेचा भंग केला आहे. जुलै 2020 मध्ये रश्मी शुक्लांनी इंडियन टेलिग्राफ अॅक्ट अन्वये सार्वनिक सुव्यवस्थेला धोक्याच्या कारणासाठी जाणीवपूर्वक दीशाभूल करुन काही खाजगी व्यक्तींच्या फोन टॅपिंगची परवानगी घेतली. मात्र, मूळ उद्देशाव्यतिरीक्त वेगळ्या प्रयोजनासाठी त्यांनी परवानगीचा वापर करुन फोन टॅपींग केले. तसेच रश्मी शुक्ला यांनी ज्यांचे फोन टॅपिंग केले त्याची परवानगी घेतली नव्हती. तसंच काही प्रकरणात फोन टॅपिंगची परवानगी एका नंबरची घेतली आणि दुसरेच नंबर टॅप केले. अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावरकरांना भाजपला पाठींबा देण्यासाठी बेकायदेशीर दबाव आणला. रश्मी शुक्ला यांनी कर्तव्यात कसूर करून जाणीवपूर्वक गोपनीयतेचा भंग करून शासनाला सादर टॉप सिक्रेट अहवाल आणि शासनापासून लपवून ठेवलेला पेन ड्राईव्ह मधील डाटा देवेंद्र फडणवीस यांना बेकायदेशीरपणे देवून उघड करून प्रसारमाध्यमाना गोपनीय अहवालाची ऑफिस प्रत रश्मी शुक्ला यांनी पुरवून महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याच्या आणि पाडण्याच्या कटकारस्थान रश्मी शुक्ला यांनी केल्यामुळे त्यांचे विरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी योगेश पवार यांनी केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget