सर्व जनतेच्या आग्रहासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे:- सौ शैलाताई गोडसे




(आता माझी उमेदवारी कायम राहणार)


सोलापूर // प्रतिनिधी

252 पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक चुरशीची होईल असे दिसत असून महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असणार्‍या शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून आपली उमदेवारी जनतेच्या आग्रहाखातर असल्याने आता माघार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शुक्रवार 26 मार्च रोजी दुपारी गोडसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अर्ज दाखल करताना त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. शैला गोडसे या शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षाअ असून त्यांनी मतदारसंघात मोठे काम उभे केले आहे. अनेक प्रश्‍नांवर त्यांनी आवाज उठविला आहे तसेच त्यांची आंदोलनही सतत होत असतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या उत्सुक होत्या मात्र ही जागा भाजपाला मिळाली व त्यांना थांबावे लागले होते. मात्र आता त्यांनी 2021 च्या या पोटनिवडणुकीत उमेदवारी दाखल करावी अशी मागणी होत होती.


 

त्यांनी मागील काही दिवसात पंढरपूर व मंगळवेढ्यात संपर्क कार्यालय उघडली आहेत. आता त्यांनी थेट उमेदवारीच दाखल केली आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, आपण येथून उमेदवारीची मागणी शिवसेनेकडे तसेच महाविकास आघाडीकडे केली होती. काहीहीच उत्तर न आल्याने अखेर आपण जनतेच्या आग्रहास्तव या निवडणूक रिंगणात उतरण्याचा आपण निर्णय घेतला व आज उमेदवारी दाखल केली आहे. यातून आता माघार नसल्याचे सांगत त्यांनी गेली अनेक वर्षे आपण येथे काम करत असून जनतेचे समर्थन आपल्याला असल्याचे सांगितले.


आता कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नसून मी माझी उमेदवारी कायम ठेवणार असल्याचे यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ शैलाताई गोडसे यांनी सर्वांना सांगितले. मी माझ्या कामाच्या बळावर विकासाची दृष्टी ठेवून उमेदवारी अर्ज भरला असून या अनुषंगाने मी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी पहिल्यापासूनच इच्छुक होते व अजूनही आहे त्याचबरोबर तळागाळातील सर्व गोरगरीब व कष्टकरी शेतकऱ्यांसाठी सदैव काम करत राहण्याची माझी भूमिका असून यासाठी मी सदैव पंढरपूर व मंगळवेढेकर जनतेच्या भल्यासाठी लढत असल्याची यावेळी सौ शैलाताई गोडसे यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget