महाळुंग येथील यमाई देवी मंदिर या पाठीमागील बाजूच्या पालखी मार्गात करण्यात आला बद्दल!




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गाची बायपासची मोजणी झाली असून तो महाळुंग श्रीपूर यमाई देवी मंदिर बोरगाव, माळखांबी अशाप्रकारे बायपासची मोजणी करण्यात आलेली होती. त्यासाठी जमिनी संपादन करण्यात आलेल्या आहेत, पण महाळुंग येथे पुरातन यमाई देवीचे मंदिर असल्याने पुरातन विभागाने पालखी मार्गाच्या कामाला विरोध दर्शवला होता व त्यांनी यमाई देवी मंदिराच्या पाठी मागून जाणाऱ्या पालखी मार्गाला हरकत घेतली होती याबाबत २०१९ मध्ये मंदिर परिसरात काम करण्या बाबत मंजुरीसाठी प्रस्ताव पुरातन विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यास डिसेंबर मध्ये मंजुरी देण्यात आली असून पुरातन विभागाने त्यामध्ये बदल सुचवण्यात आला असून १२०० मीटर यमाई देवी मंदिरापासून पूर्व-पश्चिम अंतर सोडण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी मोजण्यात आलेले गट नंबर मध्ये थोडे बदल करून, पालखी मार्गाचे वाटपा वगळण्यात आले आहे. त्या ठिकाणी बाराशे मीटरच्या दुरुस्त्या करण्यात येणार असून नवीन बाधित होणाऱ्या गटांची  मोजणी २७ मार्च रोजी सुरू करण्यात येणार आहे.


तुकाराम महाराज पालखी मार्ग  महाळुंग मध्ये थोडा बदल

यमाई देवी मंदिर पाठीमागे पूर्व-पश्चिम बदल होणार

बाराशे मीटर अंतराचे गट नंबर मध्ये होणार बदल

27 मार्चला होणार गटाची मोजणी

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget