पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघातील मतदार अपक्ष लोकप्रतिनिधीचं निवडुन देतील असे मत पंढरपूर प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख संतोष मोरे यांनी म्हटले आहे.कारण महाविकास आघाडी सरकारणे व विरोधी पबक्षानेहि शेतकऱ्यांना अडचणीत आणले असुन कोरोनाने लाखो रुपयांचे शेती मालाचे नुकसान झाले आहे.त्यानंतर अवकाळि पाऊस ,गारपीठ झाली .कोरोना अजुन रौद्र रुप धारण करत आहे.ऐन उन्हाळ्यात हाता तोंडाशी आलेली पिके विज वितरणने विज बंद केल्याने जळु लागली.कोणत्याही लोकप्रतिनीधी किंवा पक्ष शेतकऱ्यांच्या बाजुने उभा राहिला नाहि.लहान मुलांप्रमाणे शेतातील पिके शेतकऱ्यांनी संभाळली होती ती विज बंद केल्याने जळु लागली म्हणून हात उसने,सावकारी व्याजाने तसेच घरातील सोने गहाण ठेऊन थोडीफार विज बिले भरुन विज पुरवठा सुरु करुन घेतला.आता पंढरपूर /मंगळवेढा निवडणुकित विज बिलाचाचं मुद्दा गाजणार आहे.तसेचं दोन लाखांवरिल कर्जाचा मुद्दा असेल,शेती मालाला हमीभाव असेल, एफ.आर.पी.प्रमाणे ऊसाचे बिल असेल असे अनेक मुद्दे आहेत कि ज्यामुळे अपक्ष आमदारचं पंढरपूर /मंगळवेढा विधान सभेचा लोकप्रतिनिधी म्हणून मतदार निवडुन देतील.व सत्तेत असणाराला व नसणाराला पण शेतकऱ्यांची किंमत कळेल

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.