शिव सरपंच सेवा संघटनेच्यावतीने महिला सन्मान सोहळा व कोविड योध्दा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

 



 सोलापूर प्रतिनिधी

शिव सरपंच सेवा संघटनेच्यावतीने उदईक दिनांक 15 मार्च 2021 रोजी महिला सन्मान सोहळा व कोवीड योद्धा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सर्व महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये आदर्श महिला पुरस्कार 2021, त्याचप्रमाणे संत पुरस्कार 2021, हे पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहेत.


 या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून व सरपंच सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री लक्ष्मणरावजी सरवदे साहेब त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श ग्राम विकास फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, सौ. जयश्रीताई शुक्ला मॅडम प्रमुख उपस्थित राहणार आहेत; हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम व अटी पाळून घेण्यात येणार असल्याचे शिव सरपंच सेवा संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा.नितीन काळे यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम पंढरपूर येथील जेठाभाई धर्मशाळेमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व प्रमुख महिला भगिनींनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन शिव सरपंच सेवा संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget