सौ शैलाताई गोडसे यांनी पंढरपूर शहरातील गाव भागातील सर्व महिलांची साधला संवाद!





(सर्वांचे प्रश्न सोडवण्याचे दिले आश्वासन)


सोलापूर // प्रतिनिधी

252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे बिगुल वाजल्यानंतर मतदार संघातील निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले असताना अपक्ष उमेदवार सौ शैलाताई गोडसे यांनी यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सौ शैलाताई गोडसे यांनी संपूर्ण पंढरपूर शहरात सर्व माताभगिनींची व वयोवृद्ध नागरिकांशी संवाद साधला असून यामधून त्यांनी सर्वांचे प्रश्न आपुलकीने जाणून घेतले आहेत. 



यामध्ये त्यांनी पंढरपूर शहरातील गाव भागातील कालिका मंदिर परिसर संत पेठ परिसर त्याचबरोबर उपनगरातील इस्बावी या भागांमध्ये आपला झंजावाती प्रचार दौरा सुरु केला असून यामध्ये त्यांनी सर्व गोरगरीब नागरिकांशी संवाद साधला आहे यामध्ये सौ. गोडसे मॅडम यांनी कुणाकुणाचे काय काय प्रश्न आहेत हे जाणून घेऊन त्याची जागेवरच सोडवणुक करण्याचा प्रयत्न केला. याच बरोबर त्यांनी पंढरपूर शहरातील सर्व महिलांशी संवाद साधताना लघु उद्योगास कशाप्रकारे चालना देण्याचे आश्वासन या वेळी सर्व महिलांना दिले इसबावी विभागातील सर्व महिला मतदारांची शैलाताई गोडसे यांनी अत्यंत मनमोकळेपणाने संवाद साधला यावेळी ज्येष्ठ वडीलधाऱ्या यांचा आशीर्वाद घेत सर्वांना आपले काम कशा पद्धतीने होईल याची माहिती सर्व नागरिकांना यावेळी  सौ.शैलाताई गोडसे यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी पंढरपूर शहरातील कालिका मंदिर संत पेठ भागाचा सुद्धा दौरा केला यावेळी अनेक नागरिकांनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने अनेक तक्रारींचा पाढा वाचला त्यावेळी ताईंनी या सर्व प्रश्नांचे निराकरण होईल फक्त मला एक संधी द्या अशी साद घातली यावेळी अनेक महिला भगिनींनी शैलाताई गोडसे यांचे औक्षण करून स्वागत केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget