आपला माणूस म्हणून मला सर्वांनी निवडून द्यावे:-समाधान दादा आवताडे




(समाधान (दादा) आवताडे यांच्या प्रचाराचा माचणूर येथे फुटला नारळ).


सोलापूर // प्रतिनिधी

252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज महायुती  व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान (दादा) आवताडे यांच्या प्रचाराचा आज मंगळवेढा तालुक्यातील श्रीक्षेत्र माचणूर येथील श्री सिद्धेश्वर  मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी समाधान (दादा) अवताडे यांच्याबरोबर सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आ. प्रशांतराव परिचारक सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे सर,

याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील असंख्य भारतीय जनता पार्टीचे समर्थक कार्यकर्ते दामाजी पांडुरंग परिवारातील सर्व सन्माननीय संचालक कारखान्याचे पदाधिकारी कामगार व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी समाधान दादा अवताडे यांनी प्रचाराचा शुभारंभ करताना सर्व माचणूर करांना आवाहन केले; मी आपला माणूस म्हणून वेळ प्रसंगी आपल्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आपल्या पर्यंत आलो आहे कोणत्याही भावनिक आमिषाला बळी न पडता फक्त पंढरपूर मंगळवेढा विकास कार्यासाठी फक्त मला सर्वांनी निवडून द्यावे व दिनांक 17 एप्रिल रोजी कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांनी मला विजयी करावे असे यावेळी समाधान दादा अवताडे यांनी सर्वांना सांगितले.

तरी सर्वांनी कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून दिनांक 17 एप्रिल रोजी मला मतदान करावे असे आवाहन यावेळी समाधान (दादा) आवताडे यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थांना केले.

यानंतर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे उमेदवार समाधान दादा अवताडे यांच्या संपूर्ण मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी, बोराळे, सिद्धापूर, तामदडी रहाटेवाडी, येथे सभा संपन्न झाल्या.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget