आज केंद्रात सत्तेत येऊन नरेंद्र मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण झाली याबद्दल भाजपाच्या वतीने " सेवा हेच संघटन" मानून आज ३० मे हा "सेवादिन" म्हणून करवीर तालुका(दक्षिण मंडल) येथे साजरा केला गेला भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल, अध्यक्ष मा. समरजित घाटगे, भाजपा प्रदेश प्रवक्ते मा.खा.धनंजय महाडिक, मा. आ. अमल महाडिक, जिल्हा महिलामोर्चा अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, जिल्हा संघटन मंत्री नाथाजी पाटिल, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटिल, जिल्हा युवामोर्चा अध्यक्ष पृथ्वीराज यादव, यांच्या मार्गदर्शनाखाली.
करवीर तालुका भाजपा युवा मोर्चा (दक्षिण मंडल) यांच्या वतीने पाचगांव,गिरगांव,नंदगांव व अन्य गावातील भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने मास्क, धान्य वाटप, कोरोना योद्धाचा सत्कार असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
यावेळेस करवीर तालुका युवा मोर्चा (दक्षिण मंडल) अध्यक्ष श्री.विशाल द.पाटील, अमर चौगले, योगेश कुकडे, दत्तात्रय दाभाडे, ओंकार देशपांडे, तानाजी जाधव, प्रवीण डवंग, सचिन पाटील, मनोज गुरव, युवराज गायकवाड, दुशंत टिपुगडे आदी कार्यकर्ते यांच्या वतीने मास्क वाटप व कोविड सेंटरला धान्य देण्यात आले, यावेळी पक्षाचे अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.