आमदार प्रणिती शिंदे यांचे मा. मुख्यमंत्री व मा. अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना पत्र
सोलापूर // प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या दरम्यान मा. मुख्यमंत्री यांनी महाराष्राष्तील जनतेसाठी मोफत अन्नधान्य वितरण करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतू राज्यातील परवानाधारक रेशन दुकानदारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याबाबत राज्यव्यापी संप पुकारलेला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला सरकारने दिलेले मोफत अन्नधान्य मिळत नाही. त्यामुळे जनतेवर अन्नधान्य वितरीत न झाल्यामुळे उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. तरी राज्यातील परवाना रेशन दुकानदारांसोबत त्यांच्या प्रलंबित मागण्यांकरीता तात्काळ बैठक आयोजित करून त्यावर तोडगा काढून लवकरात लवकर महाराष्ट्रातील रेशनदुकाने सुरु करून जनतेला मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात यावे अशी आग्रही विनंती पत्राव्दारे आमदार प्रणिती शिंदे यांनी मा मा. मुख्यमंत्री, श्री. उध्दव ठाकरे साहेब व मा. अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ साहेब यांच्याकडे केली.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.