सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित आमदार समाधान अवताडे यांनी अकलूज येथील शिवरत्न बंगला याठिकाणी येऊन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सौ.
नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांचे आशीर्वाद घेतले.
नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांचा सन्मान माजी उपमुख्यमंत्री व भाजपचे निमंत्रक विजयसिंह मोहिते पाटील यांनी केला.
यावेळी सौ. नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते-पाटील, सौ. सत्यप्रभा रणजीतसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्या शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील, अकलूजचे विद्यमान उपसरपंच शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील आदी मोहिते पाटील परिवारासह विजय बुरुकुल व सरोज काझी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.