पंढरपुर-मंगळवेढ्याचे आ.समाधान आवताडे यांनी घेतली जिल्हाधिका-यांची भेट

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांना नवीन कोविड सेंटर उभारणीसाठी व ऑक्सिजनचा वाढीव साठा उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली आहे.मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी आ.समाधान आवताडे यांनी केलेल्या मागणी संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लवकरच सेवा देण्यासाठी सर्वसुविधा पुरवण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख, निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते.


जिल्हाधिकारी बोलताना म्हणाले की, मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर बरोबर ऑक्सिजन कमी पडणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.आ.आवताडे यांनी केलेल्या सूचनेनुसार दोन्ही तालुक्यात कोरोना तपासणीचे (टेस्टिंगचे) प्रमाण वाढवण्याच्या सूचना तेथील स्थानिक पातळीवर दिल्या जाणार आहेत.




पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघातील कोरोनाचा वाढता कहर आणि ऑक्सिजन वायुचा तुटवडा या अनुषंगाने आज पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांचेसमवेत जिल्हाधिकारी डॉ.मिलिंद शंभरकर यांची आज भेट घेतली होती.दरम्यान मंगळवारी आ.समाधान आवताडे यांनी टेंभुर्णी येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास भेट दिली होती. व या प्रकल्पा अंतर्गत होणाऱ्या ऑक्सिजन निर्मितीची व निर्मिती दरम्यान येणाऱ्या विविध अडचणी या विषयावरही यावेळी चर्चा झाली व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी टेंभुर्णी येथील प्लंटला कोटा वाढवून दिला असल्याचे सांगितले.



 

त्याचबरोबर कोरोनाच्या या महाभयंकर साथीत पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघात रुग्णांची वाढती संख्या व त्याप्रमाणात अपुरी पडणारी रिमडेसिवर इंजेक्शन, वेळेत उपलब्ध न होणारा ऑक्सिजन व मागणी तितक्या प्रमाणात न मिळणारी वॅक्सीन डोस हेही मुद्दे यावेळी चर्चिले गेले.मतदार संघात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून यावरती आपण ठोस पाऊले उचलून लवकरात लवकर हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून प्रयत्न करूया असे अभिवचन आ. आवताडे यांनी यावेळी दिले.


याप्रसंगी मागील वर्षापासून सुरु झालेल्या या कोरोना कालावधीत अतिशय नेटके नियोजन करून काम करणारे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.शंभरकर यांचे आ. समाधान आवताडे यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget