'दैनिक शोध न्यूज' चे संपादक आणि अवघ्या जगाचे मित्र असलेले वामनराव सौदागर गायकवाड यांचे आज दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनाने त्यांचा अवघा मित्र परिवार शोकाकुल झाला आहे.
जगन्मित्र वामनराव गायकवाड यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती पण आज दुपारी अचानक त्यांची प्राणज्योत मालवली आणि ते निघून गेले. येत्या काही दिवसांत ते परत येतील अशी आशा होती आणि तशी प्रतीक्षाही होती पण दुर्दैवाने हे घडले नाही.
वामनराव गायकवाड हे केबल व्यवसायिक म्हणून ते सर्व पंढरपुरकरांना परिचित होते त्याचबरोबर त्यांनी आज पर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यांच्या दुःखद निधनामुळे पंढरपुरातील सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
६६ वर्षाच्या वयातही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा होता. प्रत्येकाशी हसतमुखाने बोलणारे वामनराव गायकवाड गेल्याने त्यांच्या मित्रपरिवारालाही धक्का बसला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.