यंत्रमाग कामगारांना दर आठवडा २हजार रुपये अनामत व मोफत धान्य वाटप करा:कामगार सेनेची मागणी



सोलापूर:यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या सर्व कामगार बंधू - भगिनींना दर आठवडा रुपये २ हजार अनामत द्यावे . तसेच त्यांची उपासमार टाळण्यासाठी धान्य स्वरुपात मदत करा . अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी ( महाराज ) यांनी दिली आहे . 

            महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष श्री . पेंटप्पा गड्डम यांना देण्यात आलेल्या निवेदनात सध्या सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या महिना भरापासुन यंत्रमाग उद्योग ( कारखाने ) बंद आहेत . त्यामुळे आपल्याच कारखान्यात काम करणारे आपलेच बंधु - भगिनी बेकार होऊन त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे उपासमारी होत आहे . त्यामुळे त्यांना कारखानदार मालकांकडून मदत मिळणे गरजेचे आहे . म्हणून आपण यंत्रमाग धारक संघाकडून सर्व कारखानदारांना अनामत स्वरुपात दर आठवडा २०००/- (दोन हजार) रुपये द्यावे . व मोफत धान्य वाटप करण्याचे सुचना द्यावेत . ही कळकळीची विनंती करीत आहोत . 

        तरी माननीयांनी वरील मागणी बाबत सहानुभुतीने विचार करुन सर्व कामगारांना मदत देण्यासाठी सोलापूर यंत्रमाग धारक संघामार्फत सर्व कारखानदारांना सुचना द्यावेत . ही नम्र विनंती . असे नमुद करण्यात आले आहे .

         यावेळी यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष मा . श्री . पेंटप्पा गड्डम यांनी यंत्रमाग उद्योगातील कामगारांबाबत सकारात्मक विचार करुन सर्व यंत्रमाग कारखानदारांना अनामत रक्कम व धान्य मदत करण्याचे सुचना देण्यात येईल असे सांगितले .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget