सोलापूर // प्रतिनिधी
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, भक्कम लोकशाहीचा पाया रचणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, नगरसेवक हाजी तौफिकभाई हत्तुरे, माजी महापौर आरिफ शेख, प्रदेश सचिव सुमनताई जाधव, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, अंबादास गुत्तीकोंडा, लक्ष्मीकांत साका, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, हारून शेख, मेघश्याम गौडा, पंडित बुवा, प्रमिला तुपलवंडे, मुमताज तांबोळी, मेहमूद शेख, रफिक चाकोले, दशरथ रुपनर, सुषमा घाडगे,अभिलाष अच्युगटला, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रकाश वाले म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचले. भारताच्या स्वातंत्र्योत्तर भवितव्याची धुरा सक्षमपणे सांभाळली. त्यांच्या अनन्य साधारण नेतृत्व गुणांनी व आधुनिकतेकडे देशाची वाटचाल करण्याच्या दूरदृष्टीमुळेच भारताची घोडदौड सुरू झाली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.