एमआयडीसी पोलिसांनी सराईत गुन्हेगारास केली अटक ; घरफोडीचे सात गुन्ह्यासह मोटरसायकलचा गुन्हा उघडकीस

 



सोलापुर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवलिंग नगर , कल्पना नगर , सिद्धरामेश्वर नगर या परिसरात मागील काही दिवसापासून घर फोडीचे गुन्हे वाढलेले होते असे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे सूचना दिलेल्या होत्या त्याच अनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटी करण पथकाकडून आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटी करण पथकाचे सहाययक पोलीस निरीक्षक खांडेकर यांच्या पथकाला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की घरफोडी गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी नामे नंदकुमार विजय कोक्कुल याला सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले त्याच पोलीस ठाण्यात आणून विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील घरफोडी केल्याचे कबुली देत पोलिसांनी त्याच्याकडून एकूण आठ गुन्हे उघडकीस आणून त्याच्या ताब्यातून 65 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने 21 तोळे चांदीचे दागिने तसेच एक हिरो कंपनीची एचएफ डीलक्स मोटर सायकल टीव्ही क***** रंगाचा एक गिटार सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल आदी साहित्य असा एकूण 2 लाख 20 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने हस्तगत केला आहे


सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे पोलीस पोलीस उपायुक्त परिमंडल श्रीमती वैशाली कडूकर मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक श्री सुहास भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाणे संजय पवार तसेच पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा विश्वनाथ शिद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर सचिन माळी गुलचंद पवार संजीव काळे महेश शिंदे सत्यजित शिंदे शंकर याळगी काशिनाथ वाघे सुभाष मुंडे बिभीषण जाधव राजेश घोडके भारत गायकवाड अमोल यादव याच बागल कोठे यांनी पार पाडली आहे

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget