सोलापुर // प्रतिनिधी
जगभरासह राज्यात कोरोनाने थैमान माजवले आहे या संकट काळात अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी धावून येतात अशातच सोलापुर मध्ये स्व.विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ब्राम्हण महासंघ व युवा आघाडी यांच्या वतीने सोलापुरातील शासकीय रूग्णालयात कोविड रूग्णांच्या नातेवाईकांची तहान भूक भागविण्यासाठी भोजन देण्यात आले. हा कार्यक्रम ब्राह्मण महासंघ संस्थापक आनंदजी दवे,विश्वस्त अँड.विश्वासजी देशपांडे,सौ.नमिताताई थिटे यांच्या मार्गदर्शनाने पार पडला.
यावेळी कार्यक्रम जिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी,पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष पद्मजा ताई टोळे, युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नितीन कुलकर्णी, शहर युवा आघाडी अध्यक्ष यश टोळे, स्वप्नालीताई देशपांडे,गणेश कवडे यांच्या उपस्थितीत होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.