सोलापुरात औद्योगिय सुरक्षा व आरोग्य विभागीय स्वतंत्र कार्यालय सुरू करावे:- कामगार सेनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन




सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूरातील औद्योगिक कारखाने व एम.आय.डी.सी. आणि त्यात काम करणारे ६० ते ७० हजार महिला व पुरुष कामगारांची संख्या लक्षात घेता सोलापूरात स्वतंत्रपणे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागीय सहसंचालकांचे कार्यालय सुरू होणे गरजेचे आहे . म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा . मुख्यमंत्री श्री . उध्दवजी ठाकरे साहेब यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 

 मा. मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सोलापूर कार्यालयात कारखाने अधिनियम १९४८ अंतर्गत ३६०० कारखाने नोंदणीकृत आहेत . आणि सोलापूर जिल्ह्यात ११ तालुके व ४ एम.आय.डी.सी. आहेत . कारखाने अधिनियम १ ९४८ अंतर्गत कारखाने मध्ये काम करणाऱ्या कामगारांची संक्ष्या सुमारे ६५ हजार इतकी आहे . त्यापैकी ५ हजार महिला कामगार काम करतात . तसेच ९ कामगार संघटना कामगारांच्या तक्रारी करण्यात कार्यरत आहेत . सोलापूर जिल्ह्यात मागील ४ वर्षात मोठ्या प्रमाणात प्राण घातक अपघात, गंभीर अपघात व आगीचे घटना असे सुमारे १०० प्रकरणे झालेले आहेत.

सोलापूरात उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य यांचे कार्यालय आहे . परंतु या उपसंचालनालयाचे नियंत्रण अधिकारी हे सहसंचालक असून त्यांचे कार्यालय पुणे येथे आहे . म्हणून कारखाने नकाशे मंजुर करणे , नविन परवाना देणे , नुतनीकरण करणे , जादा कामाचे सुत व असे इतर अनेक अधिकार हे सहसंचालक पुणे -२ यांना आहे . त्यामुळे वरील सर्व कामगाजासाठी पुण्यास वारंवार जावे लागते . म्हणून त्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च टाळण्यासाठी कारखानदार व कामागरांचा फायदा होणार आहे . अतिधोकादायक कारखानांची संख्या १८ ( एम.ए.एच. ) , साखर कारखान्यांची संख्या ३६ , मुख्यथा यंत्रमाग कारखाने , रसायने कारखाने , इंजिनिअरिंग कारखाने अशा अनेक कारखाने सोलापूरात आहेत. त्याच बरोबर नविन कारखानेही वाढत आहेत . म्हणजेच कारखाने निरिक्षक कार्यालयाचे कामकाजात वाढ झालेली आहे. हे सर्व काम लवकरात लवकर होण्यासाठी सहसंचालक हे पद सोलापूरात निर्माण करून त्यांचे विभागीय कार्यालय सोलापूरात कारखान्या संबंधित प्रां.फंड , महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ, बॉयलर ऑफीस , प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर विभाग असे सर्व विभागीय कार्यालय आणि पासपोर्ट ऑफीस सुरू आहेत, केवळ सोलापूर येथे सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य यांचे कार्यालय सुरू झाल्यास कारखानदार व कामगारांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे .

तरी माननीय महोदयांनी वरील विषयांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सोलापूर येथे सहसंचालक , औद्योगिक सुरक्षा व आरोग्य यांचे कर्यालय सुरू करावे . ही नम्र विनंती . असे नमुद करण्यात आले . 

सदर निवेदनाचे प्रत माहितीस्तव १) मा. कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई . २) मा. कामगार राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ३) मा. पालकमंत्री, सोलापूर जिल्हा. ४) मा. सचिव, उद्योग व ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई. ५) संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ६) मा. जिल्हाधिकारी, सोलापूर. यांना पाठविण्यात आले आहे .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget