सोलापूर // प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने सर्व जनतेच्या हितासाठी संचारबंदी, व लॉकडाउन केले आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प, रोजगार बंद, सोलापूर शहरात बहुसंख्य बिडी, यंत्रमाग, असंघटीत कामगार, बांधकाम कामगार असून या सर्वांचे रोजगार बंद आहेत, रोजचे उत्पन्न बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच अनेक वृद्ध, निराधार, गरजु नागरिक यांचे ही लॉकडाऊन मुळे जेवणाचे हाल होत आहेत.
कोरोना संकट काळात कोणी ही उपाशी राहू नये म्हणून स्वतःच्या ताटातले दोन घास काढून भुकेलेल्यांना देणे ही भावना मनात ठेवून आमदार प्रणिती शिंदे यांनी असे आवाहन केले होते की, आपल्या घरात स्वयंपाक करताना 10 ते 20 चपाती व भाजी जास्त करून गरजूंना "मदतीचा एक घास" मोफत जेवण वाटप, करण्यासाठी महिला कॉंग्रेस व प्रियदर्शिनी सेलच्या माध्यमातून एकत्र जमा करण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतीसाद मिळाला तसेच कम्युनिटी किचनद्वारे लॉकडाऊन काळात रोज शहरातील विविध भागातील व घरपोच असे जवळपास रोज अडीच हजार लोकांना मोफत जेवण वाटप हा अन्नसेवा महायज्ञ एक महिना सुरू होता. गेल्या महिन्याभरात तब्बल साठ हजार लोकांना मोफत जेवण देण्यात आले. या जेवणामध्ये चपाती, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या व मसाला भात असा जेवणाचा प्रकार होता.
या अन्नसेवा कार्यासाठी व जेवण वाटपासाठी अनेकांचे सहकार्य लाभले, यात व्यवसायिक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला कॉंग्रेस, प्रियदर्शिनी सेल पदाधिकारी, जाई जुई विचार मंचचे कार्यकर्ते यांचे सहकार्य सहकार्य लाभले त्यांच्यामुळेच शहरातील विविध भागात व घरपोच मोफत जेवण देण्यात आले.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.