पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे पंढरपूर तालुका चे माजी आमदार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माजी अध्यक्,पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजूबापू पाटील यांचे दु:खद निधन झाल्यामुळे येथील शाकंभरी देवीच्या सभा मंडपात सर्व ग्रामस्थांच्या वतीने शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे म्हणाले,मोठे मालक व राजूबापू याच्या आकस्मित जाण्याने पंढरपूर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, सहकार ,शिक्षण क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधी ही भरून निघणार नाही.त्याना शिवसेना, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंचायत समिती च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
यावेळी इस्माईल मुलाणी,भगवान चौगुले,हरिभाऊ शिंदे,शिवाजी गवळी,ज्ञानेश्वर गवळी,सरपंच धोंडीराम शिंदे,उपसरपंच अंबादास कुचेकर,कारखाना कर्मचारी, सचिव, पांडुरंग परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.