पंढरपूर // प्रतिनिधी
श्री संत दामाजी सह।साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये १६/१/२०२० ते ११/३/२०२० या हंगाम संपेपर्यंच्या कालावधीत गळीतास आलेल्या ऊसाचा दुसरा ऑडव्हान्स ऊस बिल हप्ता रु।६००/- प्र।मे।टन प्रमाणे संबंधीत शेतक-यांनी मागणी केलेल्या त्यांचे पुर्वीचे बँकेतील खात्यावर वर्ग केला आहे। सन २०१९-२० मध्ये कारखान्याने १६२७९६ मे।टन ऊसाचे गाळप केले असुन ऊसाची एफ।आर।पी। रु।२१४७/- प्र।मे।टन आहे। यापैकी आज अखेर कारखान्याने रु।२१००/- प्र।मे।टन प्रमाणे रक्कम सर्व ऊस उत्पादक शेतक-यांना अदा केली आहे। उर्वरित एफ।आर।पी। रु।१४७/-प्र।मे।टन प्रमाणे लवकरच शेतक-यांचे खात्यावर जमा करणार असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री।समाधान आवताडे यांनी दिली। आपले जिल्हयासाठी वरदायीनी ठरलेले उजनी धरण पुर्ण क्षमतेने भरणेच्या मार्गावर असलेने तालुक्यातील शेतकरी मोठया प्रमाणात ऊस लागवड करताना दिसत आहेत। तसेच येणा-या सन २०२०-२१ हंगामाकरिता ऊसाचे वाढीसाठी पोषक वातावरण असुन पाऊस चांगला झालेने कारखान्याने ६।०० लाख मे।टन ऊस गाळपाचे उदद्ीष्ठ ठेवले असुन सर्व ऊस उत्पादक सभासद शेतक-यांनी आपला ऊस दामाजी कारखान्यास गळीतासाठी पाठवुन सहकार्य करावे असे आवाहन केले व येणारा हंगाम सर्व संचालक मंडळ,ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कामगार,यांचे सहकार्यातुन निश्चीतपणे यशस्वी करणेबाबत त्यंनी विश्वास व्यक्त केला।
ऊस बिलाबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री। झुंजार आसबे म्हणाले कि, शेतक-यांचे सोईनुसार समर्थ सह।बँक,बॅक ऑफ महाराष्ट्र,भारतीय स्टेट बँक, सोलापुर जिल्हा मध्यवर्ती सह।बँक, राजमाता अर्बन बॅक, धनश्री पतसंस्था, यशोदा पतसंस्था, बबनराव आवताडे पतसंस्था इत्यादी मंगळवेढा तालुक्यातील बँका पतसंस्थाचे शाखामध्ये पुर्वीचे खात्यावर ऊस बिले वर्ग केली आहेत। सध्या कोरोना विषाणु संसर्ग असताना अडचणीवर मात करत कारखान्यातील ऑफ सिझनमधील मशिनरी दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत। येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत कारखाना मशिनरी ऊस गाळपास सज्ज होईल। कारखान्याचे चेअरमन मा। समाधानदादा आवताडे, तालुक्याचे नेते मा।बबनराव आवताडे, व्हाईस चेअरमन श्री।अंबादास कुलकर्णी व संचालक मंडळाचे मार्गदर्शनानुसार येणा-या हंगामात निश्चीतपणे ६।००लाख मे।टन ऊस गाळपाचे उध्द्ीष्ट पुर्ण करणार असलेचे त्यांनी सांगीतले। सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक मंडळ सदस्य, खातेप्रमुख उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.