पंढरपूर // प्रतिनिधी
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, पांडुरंग परिवाराचे सर्वेसर्वा, पंढरपूर अर्बन बँकेचे कुटुंबप्रमुख स्व. सुधाकरपंत परिचारक यांना पंढरपूर अर्बन बँकेची शाखा नवीन पेठ येथील कर्मयोगी सभागृह येथे आज गुरुवार दि.20/8/2020 बँकेचे संचालक व सल्लागार मंडळ, कर्मचारी वर्ग यांच्या तर्फे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
25 वर्षे आमदारकीत असून निष्कलंक आमदार असणाऱ्या मोठ्या मालकांना देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी कर्मयोगी, सहकाराचे डॉक्टर, राजकीय संत अशा विविध उपाधीने संबोधित करीत होते.
स्व. सुधाकरपंत परिचारक यांना पंढरपूर अर्बन बँकेत सन 1966 ते 2002 अशी 36 वर्षी संचालक व त्यातील 14 वर्षे चेअरमन पदी ही भूषविले होते. त्यांच्या काळात बँकेमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय होऊन शाखाविस्तार व राष्ट्रपती महोदयांच्या उपस्थित शतकमहोत्सवी कार्यक्रम संपन्न झाला होता. त्यानंतर ही आज पर्यंत त्यांनी बँकेचे कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत होते त्याचबरोबर त्यांनी सामाजिक, राजकीय, व्यापारी, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात योगदान दिले.
शिस्तप्रिय व काटकसरी स्वभाव यामुळे अनेक संस्था नावारूपाला आल्या.
भीमा कारखाना, एसटी महामंडळ अशा तोट्यात असणाऱ्या संस्था ही नफ्यात आल्या. त्यांच्या लोकप्रिय व्यक्तिमत्व मुळे आणि एक जिवाभावाची माणसे कुटुंब त्यांना जोडली गेली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे व आजारामुळे त्यांचे आकस्मिक निधन झाले शेवटपर्यंत त्यांचे आयुष्य हे सर्वसामान्यांच्या उद्धारासाठीच होते.
त्यांच्या जाण्याने पंढरपूर बँक परिवाराचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, अशी व्हाईस चेअरमन दीपक शेट्टी यांनी सांगितले. या वेळी बऱ्याच जणांनी त्यांच्या बद्दलच्या आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन दिपक शेटे, संचालक रजनीश कवठेकर, उदय उत्पात, हरीश ताठे, चंद्रकांत निकते, पांडुरंग घंटी, सतीश मुळे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, भाऊसाहेब जगताप, सोमनाथ होरणे, सौ. रेखाताई अभंगराव, सौ. माधुरीताई जोशी, मुन्नागीरी गोसावी, रामचंद्र माळी, मनोज सुरवसे, तज्ञ संचालक राजेंद्र बजाज, प्रकाश कुलकर्णी, शाखा सल्लागार गजेंद्र माने, चंदुलाल सुपेकर, नंदकुमार कटक, राजीव कटेकर, अजय पेनुरकर, स्नेहा बडवे, आसावरी पटवर्धन, दिलीप शहा, शिरीष पारसवार, नागेश सिंघण, सुनील पाटील, राजेंद्र नवाळे, पुरुषोत्तम खडके, भगवंत बहिरट, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, सरव्यवस्थापक भालचंद्र जोशी व कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.