सोलापूर // प्रतिनिधी
"बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले" या म्हणीप्रमाणे माननीय श्री आमदार यशवंत तात्या माने याने पुळूज येथे उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी आल्यावर आमदार साहेबांनी सांगितले होते सरपंच साहेब व मुबिना ताई तुम्ही या ठिकाणी वरून उपोषण सोडा तुमच्या मागण्या आहेत, याच्यापेक्षा मी तुम्हाला ज्यादा देणार आणि त्याच म्हणीप्रमाणे त्याच शब्दाला जागून आज आमदार साहेबांनी उपोषणाच्या बसल्या ठिकाणावरून वर अधिकारी साहेबांना फोन लावून पुळुज येथील 102 नंबरचे ॲम्बुलन्स गाडी हि खराब आहे तेथे नवी मला दुसरी गाडी पाहिजेल तेथील सरपंचाची ही मागणी मान्य झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आमदार साहेबांनी वर अधिकाऱ्यांना केली व त्याची प्रचिती आज आमदार साहेबांनी सांगितलं होतं ती चार-पाच दिवसात सरपंच नवी गाडी देणार तुम्हाला आणि आज आमदारांनी सांगितल्याप्रमाणे पुळूज गाव मध्ये अंबुलन्सची गाडीची पूजा करण्याचा योग प्रथमच इतिहासामध्ये आला. स्वतः गाडी जरी पूजा करता नाही आली तरी प्रयत्न करून गावासाठी लढवून आमदार साहेबांच्या प्रयत्नातून 102 दोन नंबरची गाडी आणून दाखवली. आमदार साहेब तुमचं करावं तेवढं कौतुक थोडा आहे ,कारण एखाद्या कार्यकर्त्यांना तुम्हाला शब्द द्यावा आणि तुम्ही ते शब्द पाळावा आमदार साहेब तुम्ही इथल्या सर्वसामान्य माणसांच्या मनावर ची सत्ता काबीज केलेले आहे .आणि तुमच्या सारखा आमदार या भागाला मिळाला खरंच या भागाचे भाग्य आहे. आमदार साहेब आम्ही आज सोमवारचा दिवस बघून आम्ही लिंगेश्वर देवाच्या सालकरी पुजारी संजय म्हमाने यांच्या हस्ते गाडीला श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आली .यावेळी मी पुळूज गावचा सरपंच शिवाजी शेंडगे राजू बापू गावडे, मधूकर बाबर,भगवान काका बाबर, अण्णासाहेब शेंडगे ,कुंडलिक बाबर ,दत्तात्रय पांढरे,जिगर मुलानी,राजू माने, आमीर मुलानी, निसार मुलानी ,अब्बास मुलांनी ,अण्णा कांबळे ,धनाजी सर्जे शिवाजी सलगर ,उमेश उपाडे, बंडू बाबर अंबुलन्स गाडी ड्रायव्हर उत्तम काळे.पुळूज ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेला आहे. आमदार साहेबांच्या कामाचं कौतुक करत सगळे सर्वसामान्य माणूस करू लागलेला आहे .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.